छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईतील खारघर येथेही होणार सभा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते मुंबईत दोन सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदी खारघर आणि शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची पहिली सभा उद्या दुपारी एक वाजता छत्रपती संभाजीनगर येथे होईल. त्यानंतर नवी मुंबईतील सेंट्रल पार्क खारघर येथे दुपारी ३ वाजता मोदींची दुसरी सभा पार पडेल. नवी मुंबईची सभा आटोपून मोदी संध्याकाळी सहा वाजता दादर, शिवाजी पार्क येथे आयोजित सभेला संबोधित करतील.
रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता खारघर येथे मोदी यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. सेक्टर २९ मधील मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात ही सभा होणार आहे. या सभेसाठी ५० हजार मतदार उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे भव्य व्यासपीठ उभारले आहे. खारघर येथील पेठपाडा मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या मैदानात हेलिपॅड उभारण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्वानपथकाद्वारे या जागेची तपासणी करण्यात येत आहे. सभा सुरळीत पार पडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
तर शिवाजी पार्क येथे राज ठाकरेंचे घर आहे. तिथेच नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. यामुळे आता ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खारघर व दादर या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल केले आहेत. शिवाजी पार्क परिसरातील अनेक रस्त्यावर गुरुवारी नो पार्किंग झोन असणार आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक पर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे. याबाबत पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत रहदारीचे नियमन केले जाईल, असे नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गांसह प्रमुख मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढण्याची अपेक्षा आहे. शिवाजी पार्कच्या आजूबाजूच्या अनेक प्रमुख रस्त्यांवर निर्बंध लागू होतील. गर्दीचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नो-पार्किंग झोन स्थापित केले आहेत.
उद्या मुंबई दौऱ्यामुळे मुंबईतील ‘हे’ १४ मार्ग असतील बंद
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईत सभा होणार आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मोदींच्या या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. वाहनधारकांसाठी परिसरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. पर्याची मार्गाने वाहतूक वळवण्यात आली असून वाहनधारकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वेस्टर्न आणि इस्टर्न हायवेवरून वाहन सभेच्या ठिकाणी म्हणजेच शिवाजी पार्ककडे येण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना या वाहनांमुळे त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत दादर आणि जवळपास परिसरातील १४ मार्गावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.
CM Shinde : वाढवण बंदर आणि विमानतळाने पालघरमध्ये विकासाची गंगा
या १४ मार्गांवर वाहतूक बंद
दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजी पार्क दादर
लेप्टिनेंट दिलीप गुप्ते मार्ग, शिवाजी पार्क गेट नंबर – ४ शीतलादेवी रोड, शिवाजी पार्क
एलजे रोड : गडकरी जंक्शन, दादरहून शोभा हॉटेल, माहीमपर्यंत
एनसी केळकर रोड : हनुमान मंदिर जंक्शन ते गडकरी जंक्शन, शिवाजी पार्क, दादर
टीएच कटारिया रोड, गंगा विहार जंक्शन ते असावरी जंक्शन, माहीम पर्यंत
एस व्ही एस रोड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरळीकर चौक (सेंच्युरी जंक्शन) ते हरिओम जंक्शनपर्यंत
केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजी पार्क, दादर.
एमबी राऊत मार्ग, शिवाजी पार्क दादर
पांडुरंग नाईक मार्ग(रोड क्रमांक ५) शिवाजी पार्क, दादर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माहेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन ,दादर
टिळक रोड , कोतवाल गार्डन सर्कल,दादर (पश्चिम) ते आरए किदवई रोड, माटुंगा (पूर्व)
खान अब्दुल गफ्फार खान रोड, सी लिंक रोड ते जेके कपूर चौकाहून माधव ठाकरे चौकापर्यंत
थडानी रोड, पोद्दार रुग्णालय जंक्शन ते बिंदु माधव ठाकरे चौकापर्यंत
डॉ. एनी बेसेंट रोड , पोद्दार रुग्णालय जंक्शन ते डॉ. नारायण जंक्शनपर्यंत
In view of ‘Public Meeting’ at Shivaji Park, Dadar on 14th November 2024, following traffic arrangements will be in place from 10.00 am to 0.00 am on 14th November.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/6zKSyhUk1U
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) November 13, 2024
पर्यायी मार्ग कोणते?
एसव्हीएस रोडकडून उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहनांना सिद्धीविनायक जंक्शनहून एसके भोळे रोड-आगार बाजार,
पोर्तुगीज चर्च, डावा वळण्यावर गोखले, एसके भोळे रोडचा पर्याय असणार आहे.
एसव्हीएस रोडहून दक्षिणेकडे जाणाऱ्या दांडेकर चौकाहून डाव्या बाजूने पांडुरंग नाईक मार्ग, राजा बडे चौक, उजव्या वळणावरून एलजे रोडहून गोखले रोड किंवा एनसी केळकर रोडचा पर्याय उपलब्ध असणार आहे.