‘या’ तारखेला री-रिलीज होणार कल हो ना हो
मुंबई : मनोरंजन (Entertainment News) क्षेत्रात अनेक नवे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर दुसरीकडे चाहत्यांच्या मनात घर केलेले आणि एकेकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेले काही जुने चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात दाखल (Re-release Movie) होत आहे. अशातच २०००च्या दशकातील चित्रपट बॉलिवूडचे (Bollywood) आकर्षण पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी सज्ज झाले आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ‘लग्नाची बेडी’ घेणार प्रेक्षकांचा निरोप
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि प्रिती झिंटा (Preity Zinta) यांचा रोमांटिक ड्रामा लवकरच चित्रपटगृहात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने (Dharma Production) सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कल हो ना हो’ (Kal Ho Na Ho Re-release) चित्रपट री-रिलीज करण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा भेटायला येणार आहे. (Entertainment News)
‘Laal ab sabke dil ka haal hai’, hone wala ab kamaal hai! 🫶🤩#KalHoNaaHo re-releasing in cinemas on 15th November at @_PVRCinemas @INOXMovies! pic.twitter.com/yWlyOrZZnP
— Dharma Productions (@DharmaMovies) November 12, 2024