Varsha Usgoankar : मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी सुनावले खडे बोल!

सिंधुदुर्ग: अनेकांना मातृभाषेत बोलायला जमत नाही व मातृभाषेत बोलता येत नाही मातृभाषेचा अभिमान असायला हवा असं थेट संदेश देत याबद्दल ते सॉरी म्हणतात यावरून मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत मातृभाषा न येणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.


गोव्यातील एका कार्यक्रमात वर्षा उसगांवकर बोलत होत्या. आपल्याला मातृभाषेचा अभिमान आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि ती बोलण्यासाठी मला सराव करण्याची गरजच नाही माझी मातृभाषा गोवन कोकणी आहे ही बोलण्यासाठी मला सराव करण्याची गरजच पडत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवामधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.




या सर्व लोकांचं मला आश्चर्य वाटतं


माझी मातृभाषा गोवन कोकणी असून ती भाषा माझे अस्तित्व आहे ती जन्मदात्री आहे तिने मला शिकवलं 'ती मी कशी विसरू शकता' असं कोकणी भाषेत थेट सवाल करत जे काही थोडी लोक म्हणतात जसे की सॉरी हा मला कोकणी तितकं येत नाही...सॉरी हा मला मराठी इतकं येत नाही.... या सर्वच लोकांचं मला आश्चर्य वाटतं. अरे जी मातृभाषा तुमची ती तुम्हाला येत नाही आणि तुम्ही कोणाची दिलगिर मागता तुमची मातृभाषा तुम्हाला अवगत नाही तुम्ही काय अमेरिकेत वाढलात का असा खडा सवालचं करत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी उपस्थित करत लोकांचे कान टोचले आहेत.




मातृभाषेचा अभिमान बाळगत ती आपली जन्मभाषा आहे, ती कोणी शिकवण्याची गरज नसते असं सांगत गोवा या त्यांच्या मातृभाषा असलेल्या कोकणीतूनच वर्षा उसगावकर यांनी मातृभाषेबद्दल असलेले प्रेम व त्यांचा अभिमान हा या कार्यक्रमातून अधोरेखित केला आहे. ज्या मातृभाषेत तुम्ही जन्माला आलात ती तुमची जन्मदात्री ती तुम्हाला आलीच पाहिजे त्यासाठी सरावची गरज नाही अशा स्वरूपाचा संदेश देत अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.







Comments
Add Comment

Sikkim Landslide PM Modi : समरदुंग बोगदा अपघात प्रकरणी पंतप्रधानांनी साधला सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील झोलुंगे अंतर्गत समरदुंग येथे

IPS officer suicide attempt : "तिनेच माझ्या संमतीशिवाय चुंबन घेतलं आणि..." IPS प्रशिक्षणार्थीचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमधून खळबळजनक खुलासे!

हैदराबाद येथील प्रतिष्ठित 'नॅशनल पोलीस अकादमीमध्ये' (NPA) एका आयपीएस प्रशिक्षणार्थीने (IPS Trainee) विष पिऊन आत्महत्येचा

PM Modi on NEET : पेपर फुटी रोखणं ही आपली राष्ट्रीय जबाबदारी" : 'नीट' परीक्षेच्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्ट भूमिका

पेपर फोडणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारच! नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नीट' (NEET) पेपर फुटी प्रकरणाची

Sikkim Landslide : सिक्कीममध्ये बोगद्यात भीषण दुर्घटना; 8 कामगारांचा मृत्यू, 19 जण अडकल्याची भीती

Sikkim Landslide : सिक्कीममधील (Sikkim) नामची जिल्ह्यात तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली

E20 Petrol : E20 पेट्रोलवर सरकारची संसदेत स्पष्ट भूमिका; इंजिन खराब झाल्याचा ठोस पुरावा नसल्याचा दावा

नवी दिल्ली : ई-20 पेट्रोलबाबत (E20 Petrol) सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्र सरकारने संसदेत आपली भूमिका

Delhi Protest : दिल्लीतील आंदोलन प्रकरणाला नवे वळण; पाकिस्तान कनेक्शनची चौकशी, ७० जण ताब्यात

नवी दिल्ली : संसद मार्चदरम्यान (Parliament March) राजधानी दिल्लीत झालेल्या आंदोलन (Violence) प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या