Varsha Usgoankar : मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी सुनावले खडे बोल!

सिंधुदुर्ग: अनेकांना मातृभाषेत बोलायला जमत नाही व मातृभाषेत बोलता येत नाही मातृभाषेचा अभिमान असायला हवा असं थेट संदेश देत याबद्दल ते सॉरी म्हणतात यावरून मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत मातृभाषा न येणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.


गोव्यातील एका कार्यक्रमात वर्षा उसगांवकर बोलत होत्या. आपल्याला मातृभाषेचा अभिमान आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलं आणि ती बोलण्यासाठी मला सराव करण्याची गरजच नाही माझी मातृभाषा गोवन कोकणी आहे ही बोलण्यासाठी मला सराव करण्याची गरजच पडत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवामधील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.




या सर्व लोकांचं मला आश्चर्य वाटतं


माझी मातृभाषा गोवन कोकणी असून ती भाषा माझे अस्तित्व आहे ती जन्मदात्री आहे तिने मला शिकवलं 'ती मी कशी विसरू शकता' असं कोकणी भाषेत थेट सवाल करत जे काही थोडी लोक म्हणतात जसे की सॉरी हा मला कोकणी तितकं येत नाही...सॉरी हा मला मराठी इतकं येत नाही.... या सर्वच लोकांचं मला आश्चर्य वाटतं. अरे जी मातृभाषा तुमची ती तुम्हाला येत नाही आणि तुम्ही कोणाची दिलगिर मागता तुमची मातृभाषा तुम्हाला अवगत नाही तुम्ही काय अमेरिकेत वाढलात का असा खडा सवालचं करत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी उपस्थित करत लोकांचे कान टोचले आहेत.




मातृभाषेचा अभिमान बाळगत ती आपली जन्मभाषा आहे, ती कोणी शिकवण्याची गरज नसते असं सांगत गोवा या त्यांच्या मातृभाषा असलेल्या कोकणीतूनच वर्षा उसगावकर यांनी मातृभाषेबद्दल असलेले प्रेम व त्यांचा अभिमान हा या कार्यक्रमातून अधोरेखित केला आहे. ज्या मातृभाषेत तुम्ही जन्माला आलात ती तुमची जन्मदात्री ती तुम्हाला आलीच पाहिजे त्यासाठी सरावची गरज नाही अशा स्वरूपाचा संदेश देत अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी मातृभाषा बोलता न येणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.







Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले