सोलापूर: सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सोलापूरकर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे हुतात्मा एक्स्प्रेसमधून रिझर्व्हेशन न करता ऐनवेळी जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तीन आरक्षित डब्यात बदल करून त्याऐवजी तीन डबे जनरल असतील. यातून सर्वसामान्य २३५ प्रवाशांना अनारक्षित (जनरल) तिकिटावर प्रवास करता येणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसला हा निर्णय लागू होणार असून, सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
Swiggy Share Outlook : स्विगीचा हिस्सा १६ टक्के कमी होईल की २० टक्के वाढेल?
कोरोनाकाळात रेल्वेने मेल एक्स्प्रेस गाड्यांतील साधारण डब्याची संख्या एक आणि दोन करण्यात आलेली होती. तसेच हुतात्माला जनरल डबा नसल्यामुळे वेटींग तिकीट असलेल्या आणि अचानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. पण, जनरल डबे घोषित केल्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हुतात्मा एक्स्प्रेला साधारण डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. अखेर ती मागणी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली आहे.