
मुंबई: मुंबई म्हणजे दिवसरात्र चालणारे शहर. या शहराला आराम असा नाही. त्यामुळेच मुंबई महानगरामध्ये मधुमेह(Diabetes), उच्चरक्तदाब, ह्दयरोग यासारख्या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमध्ये व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाइप २ हा प्रकार वाढून येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जागतिक मधुमेह दिन निमित्ताने दिनांक १४ नोव्हेंबरपासून मधुमेह आणि आहार विषयक जनजागृती राबविण्यात येणार आहे. मधुमेह दिनाची यंदाच्या वर्षीची संकल्पना 'ब्रेकिंग बॅरिअर्स, ब्रिजिंग गॅप्स' ही आहे. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये मधुमेह संबंधित विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. रक्तदाब, मधुमेह तपासणी केंद्र याठिकाणी समुपदेशन करतानाच जनजागृती मोहीमदेखील आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई: तोंडाचे आरोग्य चांगले राखणे नेहमी गरजेचे असते. यातील दुर्लक्ष आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशातच जाणून घेऊया की रात्रीचे जेवण ...
जागतिक आरोग्य संघटना व बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मुंबईमध्ये सन २०२१ मध्ये केलेल्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार, १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे १८ टक्के व्यक्तींमध्ये उपाशीपोटी असताना रक्तातील साखरेचे प्रमाण १२६ मिलिग्रॅम (mg/dl) पेक्षा अधिक वाढलेले आढळले आहे. प्री-डायबेटिस - (Impaired fasting glycemia) ची टक्केवारी १५ टक्के आहे. लठ्ठ आणि बैठे काम करणाऱया व्यक्तींमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका अधिक असतो.
मधुमेह(Diabetes) जनजागृती मोहिमेत खाली नमूद विविध प्रकारचे संदेश
• ३० वर्षांवरील सर्व मुंबईकरांनी रक्तांमधील साखरेची व रक्तदाब चाचणी करणे आवश्यक.
• प्रक्रिया केलेले अन्न (processed food) खाणे टाळावे. त्यावरील सूचना (food Label) वाचावी.
• दैनंदिन आहारात साखरेचा वापर कमी करणे.
• मिठाचा कमी प्रमाणात वापर करणे. ( ≤5g/day- साधारण १ छोटा चमचा).
• नियमित व्यायाम (कमीत-कमी अर्धा तास रोज चालणे) आणि योगा अभ्यास.