मुंबई: तोंडाचे आरोग्य चांगले राखणे नेहमी गरजेचे असते. यातील दुर्लक्ष आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशातच जाणून घेऊया की रात्रीचे जेवण जेवल्यानंतर किती वेळाने ब्रश केले पाहिजे.
दातांची साफसफाई अतिशय गरजेची असते. दिवसातून दोनदा ब्रश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. रात्री झोपण्याआधी ब्रश केल्याने दातांना त्याचा फायदा होतो. मात्र अनेकजण रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेचच ब्रश करण्यासाठी जातात. मात्र असे करणे अजिबात योग्य नाही.
तोंडाच्या आरोग्याबाबत थोडेसे दुर्लक्ष हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांच्या मते जर खाण्यामध्ये आंबट फळे, अॅसिडिकसारख्या पदार्थांचा समावेश असेल तर तोंडाची पीएच लेव्हल कमी होते. यामुळे अॅसिडिटिक होतात. यामुळे दातांचे इनॅमल कमकुवत बनू शकते. अशातच जर खाण्यानंतर लगेचच दातांवर ब्रश केले जाते तर इनॅमल खराब होण्याचा धोका अधिक वाढतो.
तज्ञांच्या माहितीनुसार जेवणानंतर अर्धा तास म्हणजेच ३० मिनिटानंतर ब्रश केले पाहिजे. इतक्या वेळात लार अॅसिड कमी होऊन इनॅमल्सला पुन्हा मिनरल्स बनण्याची संधी देते.
जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर ब्रश करण्यासाठी जात असाल तर सगळ्यात आधी पाण्याने चूळ भरा. अथवा पाणी प्या. यामुळे इनॅमल मजबूत होण्याची प्रक्रिया सुरू होते. ब्रश करण्यासाठी वेळच नव्हे तर योग्य पद्धतही गरजेची आहे. हलक्या हाताने, उभ्या पद्धतीने स्क्रबिंग चांगली असते. सॉफ्ट ब्रिसल्स वापरल्याने दातांचे इनॅमल खराब होत नाही.
तज्ञांच्या माहितीनुसार कमीत कमी दोन मिनिटे ब्रश केले पाहिजे. या दरम्यान दातांची सर्व लेयर कव्हर झाल्या पाहिजेत. तसेच जीभही साफ केली पाहिजे. कारण यामुळे बॅक्टेरिया वाढत नाही आणि तोंडाला दुर्गंधीही येत नाही.