Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीJ. P. Nadda : देशविरोधी शक्तींना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस, उद्धव ठाकरेंना धडा...

J. P. Nadda : देशविरोधी शक्तींना पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस, उद्धव ठाकरेंना धडा शिकवा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आवाहन

मुंबई : राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष देशविरोधी, विभाजनवादी शहरी नक्षलवाद्यांच्या आश्रयाला जाऊन बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंची प्रखर राष्ट्रवादाची विचारसरणी गुंडाळून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली. अशा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मतदारांनी धडा शिकवावा,असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी बुधवारी केले. नड्डा यांनी अभियंते,सनदी लेखापाल,डॉक्टर आदी विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी संवाद साधताना हे आवाहन केले. मलबार हिल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी नड्डा (J. P. Nadda) यांनी देशातील विभाजनवादी शक्तींना शहरी नक्षलवादी टोळीकडून कशा प्रकारे सहाय्य मिळत आहे याचे विस्ताराने विवेचन केले. नड्डा म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेसचा खासदार, दक्षिणेकडून केंद्राला अधिक कर जातो.मात्र,त्याचा विनियोग उत्तर भारतासाठी होत असल्याने,दक्षिण भारतासाठी स्वतंत्र देश हवा अशी भाषा करतो तेव्हा त्याचा निषेध ही होत नाही. जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्याला काँग्रेसची उमेदवारी मिळते, यावरून काँग्रेसचा देशविरोधी शक्तींना असलेला पाठिंबा दिसून येतो.

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर; शिवाजी पार्कवर मोदींचा ‘नाद’ घुमणार

महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची,समाजसुधारकांची भूमी आहे,असा उल्लेख करत नड्डा यांनी आपल्या संवादास प्रारंभ केला. नड्डा म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोदी सरकारचा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरला आहे. मराठी सारख्या वैभवशाली परंपरा असलेल्या भाषेतील संतांनी, साहित्यिकांनी भारताच्या सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेची सामान्य माणसाला ओळख करून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजकीय संस्कृती पूर्णपणे बदलून टाकल्याचे सांगत, गेल्या १० वर्षात देशाच्या राजकारणाची परिभाषा कशी बदलली याचा विस्ताराने नड्डा (J. P. Nadda) यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, १० वर्षांपूर्वी देशात घराणेशाही,भ्रष्टाचार याला प्रतिष्ठा मिळाली होती. राजकीय स्वार्थासाठी धर्म,राज्य, भाषा यांच्या आधारे जनतेला एकमेकांविरुद्ध झुंजवत ठेवले होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर राजकारणाला विकासाची,उत्तरदायित्वाची, गरिबांच्या सेवेची भाषा केली. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने आपल्या कामगिरीचे प्रगती पुस्तक वारंवार जनतेपुढे ठेवलेच पाहिजे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -