
डॉक्टरांनी सांगितले कारण
कैरो : सध्या अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे बाहेरचे खाणे टाळले पाहिजे असे डॉक्टरांकडून सातत्याने सांगितले जाते. असाच काहीसा प्रकार इजिप्तमध्ये (Egypt) घडला आहे. दोन वर्षांची क्लो क्रुक नावाच्या मुलीला एका रेस्टॉरंटमधील अन्न खाल्ल्यानंतर विषबाधा झाली. त्यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथेही तिची प्रकृती खालावली असल्यामुळे ती कोमात गेली आणि काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. परंतु उपचारादरम्यान या काळात मुलीला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
बदलत्या हवामानामुळे माणसाला विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत शरीर, रोग प्रतिकारशक्ती कमी असते. तसेच यावेळी बाहेर खाल्लेले हानिकारक अन्न देखील आरोग्य खराब करू शकते. हाच प्रकार इजिप्तमधील क्लो क्रुक नावाच्या मुलीसोबत झाला.

मुंबई: थंडीचे दिवस सुरू होताच नाक गळणे, घसा खवखवणे या समस्या सुरू होतात. ऋतू बदलताच शरीरातही ते बदल होतात आणि त्यामुळे हे आजार सतावतात. मात्र नाक गळत ...
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही मुलगी हेमोलाइटिक यूरेमिक सिंड्रोम (एचयूएस) या आजाराने ग्रस्त होती, जो रक्ताशी संबंधित गंभीर आजार आहे. द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, क्लोला यूकेला नेण्यात आले, जिथे तिची प्रकृती गंभीर असल्याने ती चार दिवस कोमात होती. तिच्या आजाराची लक्षणे सतत वाढत होती. क्लोला न्यूमोनिया झाला होता, तसेच तिच्या घशात गुठळ्या झाल्या होत्या. हे सर्व हेमोलाइटिक युरेमिक सिंड्रोममुळे होतात. (Food Poisoning)