मुंबई: थंडीचे दिवस सुरू होताच नाक गळणे, घसा खवखवणे या समस्या सुरू होतात. ऋतू बदलताच शरीरातही ते बदल होतात आणि त्यामुळे हे आजार सतावतात. मात्र नाक गळत असेल अथवा गळ्यात खवखव होत असेल तर कशात मनही लागत नाही. अशा वेळेस सकाळी चहा कॉफी पिण्याऐवजी लिंबू आणि लवंगाचे पाणा एक गरम कप प्या. यामुळे सर्दीचा त्रास दूर होण्यास मदत होते.
लिंबामध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. यामुळे इम्युनिटी वाढते. सोबतच हे प्यायल्याने घसा मोकळा होण्यास मदत होते. यामुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते.
दुसरीकडे लवंगामध्ये सूजविरोधी आणि किटाणूविरोधी घटक असतात. यातील युजेनॉल आणि गॅलिक अॅसिड असते. जे अँटीऑक्सिडंटसारखे काम करतात.
लवंगामुळे खोकला कमी होण्यास मदत होते. तसेच सर्दीमध्ये श्वास घेण्यास मदत होते. यामुळे आरामात झोप लागते.
असे बनवा ड्रिंक
आधी लवंग टाकून पाणी गरम करून घ्या. त्यानंतर आरामदायक तापमानावर थंड करा. पाण्यामध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण कायम राखण्यासाठी थंड झाल्यावर लिंबू टाका. त्यानंतर त्याच एक चमचा मध टाका.