Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीThackeray Vs Shinde Group : शिवसेना विरुद्ध शिवसेना! जोगेश्वरी राड्याप्रकरणी उबाठा गटाविरोधात...

Thackeray Vs Shinde Group : शिवसेना विरुद्ध शिवसेना! जोगेश्वरी राड्याप्रकरणी उबाठा गटाविरोधात गुन्हे दाखल

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणसंग्रामात मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) येथे शिवसेना विरुद्ध शिवेसेना (Thackeray vs Shinde Shivsena Group) गटात जोरदार राडा झाला. काल रात्री मातोश्री क्लबबाहेर दोन्ही गट समोरासमोर आले असता त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली. या राड्याप्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पैसे वाटप होत असल्याच्या आरोपामुळे दोन्ही शिवसेना गटाविरोधात हाणामारी झाली. यावेळी रात्री शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यावेळी रस्त्यावर मोठी गर्दी झाल्यामुळे नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनिषा वायकरांच्या महिला कार्यकर्त्याच्या गाडीचा पाठलाग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्यामुळे देखील विनयभंगाचा गुन्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केला आहे.

काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार! काश्मिरमधून दहशतवाद संपविण्याचे काम मोदींनी केले

या प्रकरणामुळे उबाठा गटात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. (Thackeray vs Shinde Shivsena Group)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -