ऑस्ट्रेलिया सरकारचा निर्णय
कैनेबरा : सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. तर अनेक लहान मुलांकडे त्यांचा स्वत:चा स्मार्टफोन देखील असतो. त्याचा वापर काहीजण गेम्स खेळण्यासाठी तर काही सोशल मीडियाचा (Social Media) वापर करण्यासाठी करतात. सोशल मीडिया हा सध्याचा अविभाज्य घटक बनला आहे. मात्र सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने (Australia Government) हे प्रकरण थांबवण्यासाठी महत्तवाचा (Social Media Ban) निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा कायदा पुढील काही महिन्यांत संसदेत मांडण्यात येणार असून, त्यानंतर कायदा मंजूर झाल्यानंतर १२ महिन्यांनी त्याची अंमलबजावणी होईल. त्यानंतर १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही.
कॅनडा सरकारच्या निर्णयाने भारतासह इतर देशांतील विद्यार्थी चिंतेत
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मुलांवर मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम होत आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत आवश्यक पावले उचलण्यात तंत्रज्ञान कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले. (Social Media Ban)