Devendra Fadnavis : ‘त्यांच्याजवळील विषय संपले,’ म्हणून आता त्यांची रडारड

  116

बॅग तपासण्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल


कल्याण : बॅगा तपासल्या तर काय वाईट झाले? त्याचा एवढा इश्यू करण्याचे कारण नव्हते. प्रचारादरम्यान आपली बॅगही निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली असून, आम्ही अजिबात रडारड केली नाही. परंतु आता त्यांच्याजवळचे (Uddhav Thackeray) सर्व विषय संपल्यानेच रडारड करून मत मागायचे काम सुरू असल्याचा हल्लाबोल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.


कल्याण पूर्वेतील महायुतीचे उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. त्यावेळी आपल्या भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेससह महा विकास आघाडीचा खरपूस समचार घेतला.


यावेळी उमेदवार सुलभा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, गोव्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, उत्तर प्रदेशचे मंत्री गिरीश यादव, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, रिपाइंचे नेते अण्णा रोकडे, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, जगन्नाथ शिंदे, शिवसेनेचे गोपाळ लांडगे, निलेश शिंदे, प्रशांत काळे, नवीन गवळी आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मार्केटमध्ये तुमचे काही सावत्र भाऊ फिरत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवाले सावत्र भाऊ लाडकी बहिण योजनेविरोधात कोर्टात गेले. मात्र कोर्टाने त्यांना फटकारले आणि ही योजना बंद होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.


या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्राची उद्योग क्षेत्रात अधोगती सुरू होती. मात्र आपले सरकार आले आणि कर्नाटक, गुजरात यांच्यापेक्षा महाराष्ट्र उद्योग गुंतवणुकीत पहिल्या नंबरवर आला. यावर्षी तर एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात आणली. आम्ही त्रिमूर्ती त्रिशूळ आहोत, महाराष्ट्राला पुढे नेणारा त्रिशूळ आहे. आम्ही सर्वांनी मिळून संकल्प केलाय, विकास हा केंद्रस्थानी आणि देशातील प्रत्येक राज्याला हेवा वाटेल असा महाराष्ट्र बनवण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.


तर उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, रडणारे रोज रडत आहेत. रडणाऱ्याना रडू द्या. मात्र आम्ही लढणारे आहेत. रडणाऱ्याना मागे राहू द्या. लढणाऱ्याना तुम्ही साथ द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तर हा देवाभाऊ गॅरंटी घेतो की, कल्याण पूर्वेला एक आदर्श मतदार संघ करण्याचे काम आम्ही करणार आणि सुलभा गायकवाड यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार असा विश्वास व्यक्त केला.

Comments
Add Comment

Kabutar Khana : "१००% टॅक्स लावा, आम्ही तयार!", कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक!

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.

Khalid Ka Shivaji : शिवरायांचा वापर करून फूट पाडण्याचा डाव? 'खालिद का शिवाजी' विरोधात हिंदुत्ववाद्यांचा प्रचंड रोष

मुंबई : 'शिवराय' म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या नावाचा वापर करून समाजात फूट पाडण्याचा डाव रचला

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये