Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजरणसंग्राम २०२४राजकीयमहत्वाची बातमी

Eknath Shinde : बाईईई काय प्रकार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झडती; बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही...

Eknath Shinde : बाईईई काय प्रकार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झडती; बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही...

मुंबई : निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या बड्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणीचं काम सुरू आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी थेट हेलिपॅडवरच बॅगा तपासतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यवतमाळमधील वणी मतदारसंघात आणि लातूरच्या औसा मतदारसंघातील सभेसाठी जात असताना त्यांच्या बॅगा तपासण्याचा व्हिडिओ त्यांनी स्वत: शूट केला होता. अशातच, ज्याप्रमाणे माझ्या बॅगा तपासल्या तशाच मुख्यमंत्री शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याही बॅगा तपासा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या बॅगा तपासल्याचा व्हिडिओसुद्धा मला पाठवा, असेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या व्हायरल व्हिडिओनंतर आता पालघर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याही बॅगांची झडती घेण्यात आली आहे. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ पालघरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेपूर्वी पालघर येथील पोलीस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हॅलिकॉप्टर येताच, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरेंवर निशाणा लगावला. ह्या बॅगेत काहीही नाही, बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच, इलेक्शन कमिशन त्यांचं काम करतय. त्यांच्यावर राग कशाला काढता, लाडक्या बहीण योजनेमुळे हे बिथरून गेले आहेत, त्यामुळे ते कोणावरही आरोप करत सुटल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

उद्धव ठाकरेंची वणी येथे बॅग तपासणी

दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतेवेळी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या, त्यावरुन त्यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच, नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोलाही लगावला होता. बॅगच काय तपासताय युरीन पॉट पण तपासा, असे म्हणत वणी येथील निवडणूक कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी शूट केला होता. त्यावरुनच, आता मुख्यमंत्र्यांनी उलटा पलटवार केला आहे. ह्या बॅगेत काहीही नाही, बॅगेत कपडे आहेत, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

बॅगा तपासल्याचा व्हिडिओ मला पाठवा

निवडणूक अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझा इथे पहिला दौरा आहे. पण माझ्या दौऱ्याआधी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही ४ महिन्यात एकाचीही नाही तपासली म्हणत आहात. पहिल्यांदा मीच तुम्हाला सापडलो. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का? ते इथं आले तर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा आहे.

Comments
Add Comment