डेहराडून: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये(Dehradun) सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा मृ्त्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. याशिवाय एका मुलाची स्थिती नाजूक आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा पार चक्काचूर झाला.
या अपघातात ज्या तीन मुलींचा मृत्यू झाला त्यात गुनीत तेजप्रकाश सिंह(१९), नव्या पल्लव गोयल(२३) आणि कामाक्षी तुषार सिंघल(२०) यांचा समावेश आहे. या तीनही मुली डेहराडूनमधील विविध शहरात राहणाऱ्या होत्या. याशिवाय ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे त्यांची नावे कुणाल कुकरेजा(२३), अतुल सुनील अग्रवाल(२४) आणि ऋषभ जैन(२४) अशी आहेत. यात कुणाल कुकरेजा हा हिमाचलच्या चंबा येथे राहाणारा होता. तर बाकी सगळे डेहराडून येथे राहाणारे होते.
याशिवाय या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सिद्धेश विपिनकुमार अग्रवाल असे आहे. तो डेहराडूनमध्ये(Dehradun) राजपूर रोड येथे राहणारा होता. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.