मुंबई: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून सातत्याने नव्या मालिकांची घोषणा होतं आहे. त्यामुळे आता तीन आणि पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या मालिका बंद होतं आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.‘आई कुठे काय करते’ या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती च्या भूमिकेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईच मत घराघरात उत्तमरित्या पोहचवल.तसंच मालिकेतील इतर पात्र देखील घराघरात पोहोचली आहेत. म्हणून मालिका बंद होणार असल्याचं कळताचं चाहते नाराज झाले आहेत. चाहते आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतंच ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर आणखी एक लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याचं समोर आलं आहे.
अभिनेत्री सायली देवधर आणि संकेत पाठक यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लग्नाची बेडी’ ही मालिका ३१ जानेवारी २०२२पासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. सुरुवातीला ‘लग्नाची बेडी’ मालिका रात्री प्रसारित होतं होती. पण त्यानंतर प्रसारणाची वेळ दुपारीची करण्यात आली. तरीही मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांचा चांगलंच खिळवून ठेवलं. मात्र ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.