Pomegranate: हिवाळ्यात जरूर खा डाळिंब, होतील जबरदस्त फायदे

मुंबई: डाळिंब(Pomegranate) फळाला गुणांचा खजिना म्हटले जाते. हे खाण्यासाठी चांगले लागतेच मात्र त्यासोबतच त्याचे आरोग्यासही अनेक फायदे होतात. दररोज डाळिंबाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते आणि ते निरोगी राहते.


डाळिंबामध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स, व्हिटॅमिन सी, फायबर, लोह, पोटॅशियम, झिंक आणि ओमेगा -६ फॅटी ॲसिड हे पोषक घटक असतात, ज्यामुळे ते एक सुपरफूड बनते.


गर्भवती महिलांना डाळिंब खूप फायदेशीर मानले जाते. यामधील अँटिऑक्सिडेंट प्लेसेंटाचे संरक्षण करतात आणि मुलाच्या आरोग्यासाठी देखील चांगले असतात.


ज्या लोकांमध्ये लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठी डाळिंब हा चांगला पर्याय आहे. डाळिंबाच्या बियांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते, जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.


हृदयविकारांपासून बचाव करण्यासाठीही डाळिंब खूप उपयुक्त आहे. त्यात अँटीहाइपरटेन्सिव्ह आणि अँटीएथेरोजेनिक गुणधर्म आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला प्लेक कमी करण्यास मदत करतात.


डाळिंबात(Pomegranate) व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

Comments
Add Comment

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे