
चिमुर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने मोठी तयारी केल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांच्या सभा एकदम दणक्यात सुरू आहेत. आज चिमुर येथे PM मोदी यांची सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. महाराष्ट्राच्या विकासात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांचा पक्ष अडथळा आणत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाविकास आघाडीने विकास प्रकल्प रखडवणे, वळवणे यात PHD केली आहे. महाराष्ट्राचा झपाट्याने विकास हा फक्त आघाडीच्या लोकांच्या बोलण्याने नाही. फक्त ब्रेकिंगच्या कामात महाविकास आघाडीने PHD केली आहे. काम रखडवणं, दिरंगाई करणं आणि दुसरीकडे वळवणं. काँग्रेसवरही पंतप्रधान मोदींनी निशाणा साधलाय. दुप्पट पीएचडी काँग्रेसनेसुद्धा केली असल्याचं त्यांनी म्हंटल. विकासकामांना ब्रेक लावण्यात काँग्रेस तरबेज आहे. यात काँग्रेसी लोक निष्णात आहेत. प्रत्येक विकास प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे आघाडीचेच लोक भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत, असा घोर आरोपही मोदींनी केला.
सर्व उपस्थितांना पंतप्रधान मोदींनी विचारले की, चिमुरची जनता महाविकास आघाडीला शहराच्या विकासात अडथळा आणू देणार का? त्यांना पुन्हा लुटण्याचा परवाना देणार का? लूट करू देणार का, त्यांची तिजोरी भरू देणार का? महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणू देणार का? हे आघाडी पक्ष प्रगतीच्या आड कसे आडवे येतात याचे चंद्रपूरची जनताच साक्षीदार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हंटल.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार रिसोडमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन अमरावती/ वाशीम : महायुतीचे सरकार ...
यावेळी मोदींनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर चांगलाच खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले, महायुतीचं सरकार कोणत्या गतीने काम करतं आणि हे आघाडी पक्ष काम कसे थांबवतात, हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा चांगलं कोण जाणू शकेल? अनेक दशकांपासून इथले लोक रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहेत, पण काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी कधीही त्यावर काम होऊ दिले नाही, असंही मोदी म्हणाले.
भाजपचा येणाऱ्या ५ वर्षात जाहीरनामा महाराष्ट्राच्या विकासाची हमी असेल, महायुतीबरोबरच केंद्रातील एनडीएचे सरकार म्हणजे महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार, म्हणजे विकासाचा दुप्पट वेग असणार आहे. महाराष्ट्र भाजपचे आज मला अभिनंदन करायचे आहे, ज्यांनी एक अद्भुत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आपल्या मुली, भगिनी, शेतकरी, देशाच्या व महाराष्ट्राच्या युवाशक्तीच्या विकासासाठी अनेक अप्रतिम संकल्प करण्यात आले आहेत, असंही मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.