दुसऱ्यांदा बॅग तपासल्याने ठाकरे सैरभैर झाले; दरवेळी मीच का पहिला म्हणत रडकुंडीला आले
लातूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नेत्यांची बॅग तपासण्याची प्रक्रिया कडकपणे राबवली जात आहे, मात्र यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बॅग दुस-यांदा तपासल्याने ते आक्रमक झाले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी मतदारसंघात प्रचारासाठी आलेल्या ठाकरेंची हेलिपॅडवर बॅग तपासली गेली. त्यावर ठाकरे संतापले आणि मोदी, शिंदे, फडणवीसांचीही बॅग तपासल्याचे व्हिडिओ मागितले. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी स्वतः शूट केला व सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर शेअर झाला.
त्यानंतर, आता औसा मतदारसंघात पुन्हा त्यांच्या बॅगची तपासणी झाली, ज्यामुळे ठाकरे अधिक संतापले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत, आयडी व अपॉईंटमेंट लेटर दाखवण्यास सांगितले. सर्व काही नियमानुसार असल्याने आणि अधिका-यांच्या तपासणीत कुठेच काही नाव ठेवण्यासारखे न सापडल्याने ते अधिकच चिडले.
औसा मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार दिनकर माने यांच्या प्रचारासाठी ठाकरे आले असताना झालेल्या या घटनेवर ठाकरे काकुळतीला येत म्हणाले की, दरवेळेला हे निवडणूक अधिकारी माझीच तपासणी का करतात. मीच का पहिला गिऱ्हाईक? असे सांगत त्यांनी (Uddhav Thackeray) स्वत:चेच हशे करुन घेतले.
CM Eknath Shinde : हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे सरकार नाही तर बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार