Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीChina Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू तर...

China Accident : धक्कादायक! भरधाव कारने अनेकांना चिरडलं; ३५ जणांचा मृत्यू तर ४३ जण जखमी

चीन : चीनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चीनमधल्या झुहाई शहरात एका कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्याने तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. झुहाई शहरातील एका स्पोर्ट्स सेंटरच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमलेली होती. मात्र, याचवेळी एका कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि भरधाव कारने तब्बल ३५ जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. झालेल्या दुर्दैवी घटनेत ३५ जणांचा मृत्यू आणि जवळपास ४३ जण गंभीर जखमी झाले आहेत. चीनमध्ये या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

ही दुर्दैवी घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेतील कारचालकाला पोलिसांनी घटनेनंतर लगेच अटक केली अशी माहिती सांगण्यात येत आहे. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी लोकांचा मोठा आक्रोश सुरु होता, असं सांगितलं जात आहे. या घटनेसंदर्भातील काही व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहेत. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

डेहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

या घटनेबाबतच्या काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अनेक लोक त्यामध्ये रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. तसेच जखमी झालेले लोक आक्रोश करत असल्याचंही दिसून येत आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने ताताडीने धाव घेत मदतकार्य करत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, अद्याप या घटनेबाबत अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, हा अपघात होता की यामागे काही वेगळा हेतू होता? याबाबत पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -