Hemant Dhome: हेमंत ढोमे च्या घरी नव्या पाहुणीचं आगमन

मुंबई: ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’ या सिनेमांमुळे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता हेमंत ढोमे यांच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. नव्या वर्षी हेमंत नव्या सिनेमासह चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. आगामी सिनेमाबद्दलचे सर्व अपडेट हेमंत सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. पण आता हेमंत आगामी सिनेमामुळे नाही तर, सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. हेमंत याच्या कुटुंबात नव्या सदस्याचं आगमन झालं आहे. हेमंतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत या नव्या पाहुणीची झलक दाखवली आहे.

हेमंत याच्या कुटुंबात आलेली नवी पाहुणी दुसरी तिसरी कोणी नाही तर गाय आहे. हेमंतने गायीचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे. पहिल्या फोटोत हेमंत म्हणाला, ‘आपल्या फॅमिलीची नवी मेंबर… लक्ष्मी ढोमे…’ गायीचा अन्य एक फोटो पोस्ट करत हेमंत म्हणाला, ‘देखणी लक्ष्मी…‘ हेमंत याने शेअर केलेल्या गायीचे फोटो सध्या तुफान चर्चेत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्याची पोस्ट आवडली आहे. हेमंत कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
Comments
Add Comment

AAFA 2026 : अल्लू अर्जुन ने जिंकली चाहत्यांची मने; भारतीय संस्कृती जपत काढली पादत्राणे

अल्लू अर्जुन आज देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया सुपरस्टार्सपैकी एक आहेत. पुष्पा फ्रँचायझीच्या अभूतपूर्व

Virat Kohli : अनुष्का आणि विराट कोहली यांनी खरेदी केले १८.२९ कोटींचे घर ; घराच्या बालकनीतून दिसते समुद्राचे दृश्य

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सर्वांच्या लाडक्या जोडीने देशभरात अनेक आलिशान मालमत्ता खरेदी

ओडिशाच्या सामान्यातल्या सामान्य घरातील लेकीची कमाल! इंटरनेट आणि गुगलच्या जोरावर जिंकला ‘मिस टीन युनिव्हर्स इंडिया २०२६’ किताब

आजच्या डिजिटल युगात सुविधांची कमतरता नसली, तरी त्या प्रत्येक गोष्टीचा अचूक आणि प्रभावी वापर करून यश मिळवणे ही एक

Shabana Azmi : 'बटवारा १९४७' च्या शूटिंगदरम्यान शबाना आझमी भावूक; सनी देओलने केली मदत

मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी त्यांच्या 'बटवारा १९४७' (Batwara 1947) या आगामी चित्रपटाच्या

Preity Zinta : 9 वर्षांनंतर प्रीती झिंटाचे दमदार कमबॅक; 'या' आगामी चित्रपटात झळकणार

मुंबई : बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा

Mrunal Thakur : मृणाल ठाकूर आणि यशस्वी जयसवाल एकमेकांना डेट करतायत? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण!

मुंबई: बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वातील नात्यांची चर्चा नेहमीच चाहत्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आली आहे.