
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी(Baba Siddiqui) यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि इतर चार आरोपींना न्यायालयाकडून १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे स्पेशल टास्क फोर्स आणि मुंबई गुन्हे शाखेने रविवारी शूटर शिवकुमार (२०) आणि त्याच्या चार साथीदारांना उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील नानपारा येथून अटक केली. अन्य चार आरोपी अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग यांना शिवकुमारला आश्रय देऊन नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
दरम्यान गुन्हे शाखेने आज, सोमवारी आरोपींना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद पाटील यांच्यासमोर हजर केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणेने त्याच्या कोठडीची मागणी केली. त्याला न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत मंजुरी दिली.

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करत सुमारे २.६७ कोटी रुपयांचे साडेतीन किलो सोने ...
माजी मंत्री बाबा सिद्दीकी(Baba Siddiqui) यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सिद्दीकी यांच्या छातीवर दोन गोळ्या लागल्या. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २३ जणांना अटक केली आहे.