निवडणुकीच्या कामाला नाही म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

ठाणे: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४साठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. मतदानाची ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानीत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.


निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. पाच वर्षातून एकदा होणाऱ्या निवडणुकीतील या राष्ट्रीय कर्तव्यास नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ‍ लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी ‍ तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.


मा.भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणूका २०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तसेच २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण ६ हजार ९५५ मतदान केंद्रे असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण ७ हजार ७१७ मतदान केंद्राध्यक्ष, ७ हजार ७१७ मतदान अधिकारी १५ हजार ४३४ इतर मतदान अधिकारी अशा एकूण ३० हजार ८६८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण देखील पूर्ण झालेले आहे. परंतु अनेक कर्मचारी त्यांना प्राप्त झालेले निवडणूक कर्तव्य आदेश रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच यासाठी अनेक जण विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या शिफारशी घेवून तसेच आजारपणाचा दाखला घेवूनही मोठ्या प्रमाणावर येत असल्याची बाब समोर आली आहे. ज्यांच्या आरोग्यविषयक अडचणी खऱ्या आहेत त्यांच्याबाबतीत प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली आहे.


तथापि निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असून कर्मचाऱ्यांकडून अशा पध्दतीचे वर्तन अपेक्षित नसल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे. ‍निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून अशा प्रकारे जे कर्मचारी निवडणुकीसाठी त्यांना प्राप्त झालेले आदेश नाकारतील, निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहतील अथवा निवडणुकीच्या कामात हयगय करतील त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार थेट कारवाई करावी, असे निर्देश ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Malegaon : चाळीसगाव फाटा ते शिवतीर्थ नवीन जलवाहिनीस महासभेत मंजुरी

Malegaon : ऐन पावसाळ्यात वारंवार जलवाहिनी फुटल्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत होते. यासंदर्भातील

Tribal Development : आदिवासींच्या उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेचे दार उघडले

- राज्य शासनाचा पुढाकार; 'शबरी नॅचरल्स' ब्रँडचे नाशिकच्या दिंडोरीत प्रक्रिया युनिट मुंबई : राज्यातील आदिवासी

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी