Thursday, April 16, 2026

काव्यकोडी

काव्यकोडी

घराची खिडकी

आमच्या घराची खिडकी मोठी खिडकीतून पाहायला साऱ्यांची दाटी खिडकीतून दिसे आभाळ मोठे सूर्य आणि चंद्र खिडकीतून भेटे पाऊस बरसून खिडकीवर येई सारखा भिजायला बोलवत राही... खिडकीतून येई घरात वारा पाहा वाहतो कसा भरारा... डेरेदार झाड एक खिडकीतून दिसे आमच्याकडे पाहून रोजच हसे... कितीतरी पक्षी खिडकीवर येतात चोचीतले गाणे गाऊन जातात... म्हणूनच घराला खिडकी असावी खिडकीतून अख्खी दुनिया दिसावी.

एकनाथ आव्हाड

१) उंच पर्वत हिरवी पाने ओल्या मातीत मधुर गाणे नामाबद्दलची ही विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय बरं म्हणती? २) कोल्हा काकडीला असतो सदा राजी कामापुरता मामा ताकापुरती आजी या तर आहेत अनुभवांच्या खाणी यांना काय म्हणतात सांगा बरं कुणी? ३) कफ आणि खोकल्यावर फारच गुणकारी विंचू दंशावरही उपयोग हिचा भारी औषधीगुण हिच्या अंगी ठायी ठायी संस्कृतमध्ये ‘वसाका’ नावाने कोण ओळखले जाई?
Comments
Add Comment