Railway Megablock : उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक!

पाहा कसे आहे वेळापत्रक?


मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेची कामे करण्यासाठी दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. उद्या देखील तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे. या कालावधील अनेक लोकलसेवा रद्द करण्यात आल्या असून विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांचा खोळंबा टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून याबाबतचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.



मध्य रेल्वे वेळापत्रक



  • कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

  • वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत

  • परिणाम : सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.


ठाणेहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.


या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.



हार्बर रेल्वे वेळापत्रक


कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर


कधी : ११.१० ते ४.४० वाजेपर्यंत


परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळ्याहून वाशी, बेलापूर, पनवेलकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून वांद्रे, गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.


पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.


ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.



पश्चिम रेल्वे वेळापत्रक



  • कुठे : माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर

  • कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत

  • परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वांद्रे आणि सीएसएमटीहून गोरेगाव हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द असणार आहेत. चर्चगेट ते गोरेगाव यादरम्यानच्या धीम्या लोकल सेवासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा