मुंबई: विमेन्स प्रीमियर लीग २०२५ साठी सर्व संघांनी रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सने खेळाडूंची रिलीज यादीही जाहीर केली आहे.
मुंबईने हरमनप्रीत कौरसह १४ खेळाडूंना रिटेन केले आहे. तर यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्मासह १५ खेळाडूंना रिटेन केले आहे. दिल्लीने एकूण चार खेळाडूंना रिलीज केले आहे. गुजरातबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी सात खेळाडूंना रिलीज केले आहे.
विमेन्स प्रीमियर लीगच्या सर्व संघांनी रिलीज आणि रिटेन लिस्ट जाहीर केली आहे. यानंतर संघांजवळील पैशांचीही माहिती मिळील आहे. आरसीबीकडे आता ३.२५ कोटी रूपये राहिले आहेत. मुंबईकडे २.६५ कोटी रूपये शिल्लक आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे २.५ कोटी रूपये राहिलेत. तर गुजरातकडे ४.४ कोटी रूपये शिल्लक राहिले आहेत. यूपीकडे ३.९ कोटी रूपये राहिलेत.
यूपी वारियर्स –
रिटेन: एलिसा हीली (कर्णधार), ताहलिया मैकग्राथ, ग्रेस हैरिस, दीप्ति शर्मा (उपकर्णधार), श्वेता सहरावत, सोफी एक्लेस्टोन, चमारी अट्टापट्टू, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड़, अंजलि सरवानी, उमा छेत्री, पूनम खेमनार, साइमा ठाकोर, गौहर सुल्ताना, वृंदा दिनेश
रिलीज: लक्ष्मी यादव, पार्श्ववी चोपड़ा, लॉरेन बेल, एस यशाश्री
गुजरात जायंट्स –
रिटेन: बेथ मूनी, लॉरा वोल्वार्ड्ट, फोएबे लिचफील्ड, अॅश गार्डनर, हरलीन देयोल, दयालन हेमलता, तनुजा कंवर, शबनम शकील, मन्नत कश्यप, सयाली सतगरे, मेघना सिंह, प्रिया मिश्रा, भारती फुलमाली, काशवी गौतम,
रिलीज: स्नेह राणा, कॅथरीन ब्राइस, ली ताहुहू, लॉरेन चीटल, तृषा पूजिथा, तरन्नुम पठान, वेदा कृष्णमूर्ति
दिल्ली कॅपिटल्स –
रिटेन : शेफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, तानिया भाटिया, राधा यादव, अरुंधति रेड्डी, शिखा पांडे, स्नेहा दीप्ति, मिन्नू मणि, तितास साधु, मेग लॅनिंग, एलिस कैप्सी, मारिज़ॅन कॅप, जेस जोनासेन, एनाबेल सदरलँड
रिलीज़ : लॉरा हॅरिस, अश्वनी कुमारी, पूनम यादव, अपर्णा मंडल
मुंबई इंडियन्स –
रिटेन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नट साइवर-ब्रंट, हेले मैथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, अमनदीप कौर, सैका इशाक, जिन्तिमनी कलिता, एस सजना, कीर्तन बालाकृष्णन, शबनीम इस्माइल
रिलीज : प्रियंका बाला, हुमैरा काज़ी, फातिमा जाफ़र, इस्सी वोंग
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –
रिटेन : स्मृति मंधाना, ऋचा घोष, रेणुका ठाकुर, आशा शोभना, श्रेयंका पाटिल, एकता बिष्ट, एस मेघना, एलिसे पेरी, सोफी डिवाइन, डैनी व्याट-हॉज (ट्रेडेड), जॉर्जिया वेयरहैम, सोफी मोलिनेक्स, केट क्रॉस, कनिका आहूजा