आजपासून खायला सुरूवात करा या गोष्टी, कधीच येणार नाही व्हिटामिन बी, बी१२ची कमतरता

मुंबई: व्हिटामिन बी१२ हे अत्यंत गरजेचे पोषकतत्व आहे जे शरीराच्या विवइध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. लाल रक्तपेशींचे उत्पादन, हेल्दी नर्व्हस सिस्टीम आणि डीएनएच्या कामांसाठी गरजेचे आहे.


कारण आपले शरीर स्वत:हून बी १२ ची निर्मिती करत नाही. यासाठी आपल्या आहारातून बी१२चा शरीराला पुरवठा करणे गरजेचे असते. व्हिटामिन बी१२ची मात्र ३००Pg/ml पेक्षा जास्त असणे नॉर्मल मानले जाते. जेव्हा हा स्तर सातत्याने की होतो तेव्हा व्हिटामिन बी १२ची कमतरता मानली जाते. जर वेळेवर याकडे लक्ष दिले नाही तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.


व्हिटामिन बी१२च्या कमतरतेमुळे हात-पाय सुन्न होतात. तसेच चेहरा पिवळा पडणे, स्किन ड्राय होणे तसेच स्मरणशक्ती कमी होणे, स्वभाव चिडचिडा होणे यासारखी लक्षणे दिसतात.


कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात बी१२ ची कमतरता निर्माण होऊ शकते. मात्र शाकाहारी लोकांच्या शरीरात बी१२ची कमतरता अधिक आढळते.


बी१२ची कमतरता भरून काढण्यासाठी डेअरी पदार्थ जसे दूध, दही आणि पनीर हा व्हिटामिन बी१२चा चांगला स्त्रोत आहे. आपल्या दररोजच्या डाएटमध्ये सामील करून तुम्ही व्हिटामिन बी१२ची कमतरता भरून काढू शकता.


सीवीड्समध्येही व्हिटामिन बी१२ असते. जपानी आणि कोरियन खाण्यामध्ये सीवीड्सचा समावेश अधिक केला जातो.


टीप - वरील लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही. संबंधित गोष्टींसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे