Matheran Mini Train : माथेरानची राणी उद्यापासून धावण्यास सज्ज!

  75

पाहा कसे असेल वेळापत्रक?


मुंबई : माथेरानचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांसाठी ‘माथेरानची राणी’ म्हणजेच मिनीट्रेन (Matheran Mini Train) उपलब्ध करु देण्यात आली आहे. मात्र पावसाळ्याच्या कालावधीत घाटरस्ता आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे चार महिने ही मिनीट्रेन सेवा बंद ठेवण्यात येते. परंतु आता उद्यापासूनच ही माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.



नेरळ - माथेरान डाऊन ट्रेन्स



  • ५२१०३ नेरळ प्रस्थान सकाळी ८ वाजून ५० मिनिटे आणि माथेरान आगमन ११ वाजून ३० मिनिटे (दररोज)

  • ५२१०५ नेरळ प्रस्थान १० वाजून २५ मिनिटे आणि माथेरान आगमन दुपारी १ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास (दररोज)
    माथेरान - नेरळ अप ट्रेन्स

  • ५२१०४ माथेरान प्रस्थान दुपारी २ वाजून ४५ मिनिटे आणि नेरळ आगमन सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटे (दररोज)

  • ५२१०६ माथेरान प्रस्थान दुपारी ४ वाजता आणि नेरळ आगमन सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास (दररोज)


५२१०३/५२१०४ आणि ५२१०५/५२१०६ एकूण ६ डब्यांसह चालविण्यात येतील ज्यामध्ये ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी आणि २ द्वितीय श्रेणीसह लगेज व्हॅन.



अमन लॉज शटल सेवा माथेरान (दैनिक)



  • ५२१५४ माथेरान प्रस्थान ०८.२० वा. आणि अमन लॉज आगमन ०८.३८ वा.

  • ५२१५६ माथेरान प्रस्थान ०९.१० वा. आणि अमन लॉज आगमन ०९.२८ वा.

  • ५२१५८ माथेरान प्रस्थान ११.३५ वा. आणि अमन लॉज आगमन ११.५३ वा.

  • ५२१६० माथेरान प्रस्थान १४.०० वा. आणि अमन लॉज आगमन १४.१८ वा.

  • ५२१६२ माथेरान प्रस्थान १५.१५ वा. आणि अमन लॉज आगमन १५.३३ वा.

  • ५२१६४ माथेरान प्रस्थान १७.२० वा. आणि अमन लॉज आगमन १७.३८ वा.


दरम्यान, शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहता अतिरिक्त विशेष सेवादेखील देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना

शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण

प्रत्येकाला विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्ग होणार - नितेश राणे

महामार्गाचा सध्याचा प्लॅन १०० टक्के बदलणार पालकमंत्री म्हणून प्रत्येकाशी संवाद साधण्यास मी तयार सिंधुदुर्ग :

कुरियरवाला असल्याचे सांगत तरुणीवर बलात्कार प्रकरणी, पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन  पुणे: कोंढवा

कन्नड तहसील कार्यालयासमोरची नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात ठिकठिकाणी सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक जुनं बांधकाम असलेल्या इमारतींची