Friday, December 13, 2024
Homeक्रीडाOlympic 2036 : ऑलिम्पिक २०३६ च्या आयोजनासाठी भारत सज्ज!

Olympic 2036 : ऑलिम्पिक २०३६ च्या आयोजनासाठी भारत सज्ज!

आयओसीकडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

नवी दिल्ली : यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत भारतीय खेळाडू व्यस्त असतील, पण भारत सरकारने २०३६ ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची तयारी सुरू केली आहे. २०३० मध्ये युवा ऑलिम्पिक आणि २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात भारत कोणतीही कसर सोडणार नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी इच्छा व्यक्त केली, अशा आशयाचे पत्र आयओएने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठवले. सूत्रांनुसार, २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची भारताची इच्छा आहे असे पत्र १ ऑक्टोबर २०२४ रोजी ऑलिम्पिक समितीला पाठवण्यात आले आहे. भारत सरकारला आशा आहे की २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळेल आणि यामुळे संपूर्ण देशामध्ये आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणासाठी फायदा होईल.

पंतप्रधान मोदींचे स्वप्न

२०२३ मध्ये मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)च्या वार्षिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०३६ उन्हाळी ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी ”भारत ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी खूप उत्सुक आहे. २०३६ ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत कोणतीही कसर सोडणार नाही. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे आणि आयओसीच्या पाठिंब्याने आम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे.’ ‘खेळ हा केवळ पदके जिंकण्यासाठी नसून मन जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. खेळ चॅम्पियन्ससोबतच आनंदही देतो,” मोदी म्हणाले.

पत्राद्वारे अनौपचारिक बोली सुरु

भारताने पत्राद्वारे २०३६ ऑलिम्पिकची अनौपचारिक बोली जुलै २०२४ मध्ये लावल्याचे करत आहे. आगामी ऑलिम्पिक आयोजनासाठी आयओाए आणि आयाओसी यांच्यातील संवाद जुलै २०२४ मध्येच सुरू झाला आहे, असे माहितीनुसार समोर आले आहे. २०३६ ऑलिम्पिकचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात येणार असून नवीन प्रकल्पांचे बांधकाम आधीच सुरू झाल्याचे समोर येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -