शिंदेंच्या शिवसेनेची ४० स्टार प्रचारकांची फौज जाहीर; अभिनेते गोविंदा, शरद पोंक्षे यांचाही यादीत समावेश

  55

मुंबई: विधानसभा निवडणुकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खुद्द एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, नीलम गोऱ्हे या ज्येष्ठ नेत्यांची फौज उतरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अभिनेते गोविंदा, शरद पोंक्षे यांचाही ४० जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. पायाला गोळी लागून झालेल्या अपघातानंतर गोविंदा पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. याशिवाय राजू वाघमारे, अक्षय महाराज भोसले, तेजस्विनी केंद्रे यासारख्या नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे.



शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी पुढील प्रमाणे:-


१. श्री एकनाथ शिंदे
२. श्री रामदास कदम
३. श्री गजानन कीर्तिकर
४. श्री आनंदराव अडसूळ
५. श्री प्रताप जाधव
६. श्री गुलाबराव पाटील
७. श्रीमती नीलम ताई गोऱ्हे
८. श्रीमती मीनाताई कांबळी
९. श्री उदय सामंत
१०. श्री शंभूराज देसाई
११. श्री दीपक केसरकर
१२. श्री तानाजी सावंत
१३. श्री दादाजी भुसे
१४. श्री संजय राठोड
१५. श्री अब्दुल सत्तार
१६. श्री भरत गोगावले
१७. श्री संजय शिरसाट
१८. श्री श्रीकांत शिंदे
१९. श्री धैर्यशील माने
२०. श्री नरेश म्हस्के
२१. श्री श्रीरंग बारणे
२२. श्री मिलिंद देवरा
२३. श्री किरण पावसकर
२४. श्री राहुल शेवाळे
२५. श्री शरद पोंक्षे
२६. श्रीमती मनीषा कायंदे
२७. श्री गोविंदा आहुजा
२८. श्री कृपाल तुमाने
२९. डॉ दीपक सावंत
३०. श्री आनंद जाधव
३१. श्रीमती ज्योती वाघमारे
३२. श्रीमती शीतल म्हात्रे
३३. श्री राहुल लोंढे
३४. श्री हेमंत पाटील
३५. श्री हेमंत गोडसे
३६. डॉ राजू वाघमारे
३७. श्रीमती मीनाक्षी शिंदे
३८. श्रीमती ज्योती मेहेर
३९. श्री अक्षय महाराज भोसले
४०. श्रीमती तेजस्विनी केंद्रे

Comments
Add Comment

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा