SBI यूजर्स सावध व्हा! WhatsAppवर असा मेसेज आला तर चुकूनही करू नका क्लिक

मुंबई: जर तुम्ही भारतीय स्टेट बँक युजर आहात तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. खरंतर, सध्या फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत आहे. फसवणूकदार फसवणूक करण्यासाठी विविध पद्धती वापरत आहेत. सध्या लोकांना बँकेच्या नावावर मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे.


युजर्स लिंकवर क्लिक करण्यासाठी विविध ऑफर्स देत आहेत. काही असेच एसबीआय युजर्ससोबत घडत आहे. मात्र एसबीआयने आपल्या युजर्ससाठी इशारा जारी केला आहे. जाणून घ्या डिटेलबाबत...


भारतीय स्टेट बँकने आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. यात असे म्हटले आहे की काही लोक एसबीआयच्या नावाने नकली मेसेज पाठवत आहेत. हे मेसेज व्हॉट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये म्हटले आहे की तुमचे एसबीआय रिवॉर्ड पॉईंट्स लवकर संपणार आहेत. अशातच ते लवकरात लवकर रिडीम करा.


मेसेजमध्ये एक लिंकही देण्यात आली आहे. एसबीआयने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. यात एसबीआयने स्पष्ट केले आहे की बँकेकडून कधीही अशा प्रकारचे मेसेजेस येत नाहीत. यासाठी ग्राहकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.


 


एसबीआय रिवार्ड पॉईंट्स


एसबीआय आपल्या ग्राहकांना नेहमी ट्रान्झॅक्शनवर रिवार्ड पॉईंट्स पाठवत असते. प्रत्येक पॉईंट्सची किंमत २५ पैसे असते. या रिवार्ड पॉईंट्सचा वापर तुम्ही कोणत्याही प्रॉडक्ट अथवा सर्व्हिसेस खरेदीसाठी करू शकता. यात कपडे, सिनेमाचे तिकीट, मोबाईल अथवा डीटीएच रिचार्ज यांचा समावेश करू शकता.

Comments
Add Comment

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल