राज्यात निकालाच्या आदल्या दिवशी पहा हाणामारी!

  83

मराठीतला पहिला अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ हा २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार


मुंबई: काही कलाकारांमुळे प्रेक्षकांचं सिनेमाकडे लक्ष वेधलं जातं, तर काही दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शक समित कक्कड हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असं नाव बनलं आहे, ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच. आजवरच्या आपल्या कामाने आणि अनोख्या सादरीकरणाने समितनं रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारे समित कक्कड आता ‘रानटी’ हा मराठीतला मोठा अ‍ॅक्शनपट घेऊन आले आहेत. बॉलीवूडचे सुप्रसिद्ध नायक जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनी या चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. या टिझरला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा अ‍ॅक्शनपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


कोणत्याही कथाविषयाचं अत्यंत बारकाईनं संशोधन करून मगच आपल्याला उमगलेलं चित्र पडद्यावर प्रभावीपणे सादर करायचं हे समित यांच्या यशाचं गमक असल्याचं त्याच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकल्यावर अगदी सहजपणे लक्षात येतं. दिग्दर्शक समित कक्कड यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात, धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, ३६ गुण अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणाऱ्या आणि सादर करण्याची क्षमता असणाऱ्या दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपली गुणवत्ता जपण्याचा कायम प्रयत्न केला आहे.


मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अंगावर रोमांच आणणारे स्टंटस आता ‘रानटी’ अ‍ॅक्शनपटात पहायला मिळणार आहे. काही मोजके अ‍ॅक्शनपट सोडले तर अ‍ॅक्शन मसाल्यासाठी मराठी चित्रपटांचा प्रेक्षकही हिंदी चित्रपटांकडे वळतो. म्हणूनच एक नवीन प्रयोग आणि मराठी चित्रपटांच्या आशयाला अ‍ॅक्शनचा तडका देण्यासाठी मी 'रानटी' हा अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट मराठीत घेऊन आल्याचं समित सांगतात. यात अ‍ॅक्शन, रोमान्स, इमोशन, ड्रामा आहे.‘हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचं एक पॉवरफुल पॅकेज आहे, त्यामुळे मला खात्री आहे की, प्रेक्षकांना देखील हा चित्रपट आवडेल.’ असा विश्वास समित कक्कड यांनी व्यक्त केला.


Comments
Add Comment

रामायण: द इंट्रोडक्शन सिनेमा बॉक्स ऑफिसवर मैलाचा दगड ठरणार का?... नऊ शहरांचं उद्या पहिल्या लूककडे लक्ष..

रामायण हे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीत अतिशय महत्वाच मानलं जात. रामायणातील विविध कथांचं वाचन आणि अध्ययन करून

कैलाश खेर यांच नवं गाणं..गायकाने दिला मराठीतून स्वच्छतेचा नारा...

दमदार आवाजाने लाखो रसिकांच्या हृदयांवर राज्य करणारे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी आजवर अनेक सुपरहिट

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय