हे पदार्थ खाल्ल्याने वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका, करू नका या चुका

  90

मुंबई: आपल्या शरीराच्या कामकाजासाठी कोलेस्ट्रॉल अतिशय गरजेचे आहे. मात्र याचा स्तर शरीरात वाढू लागल्यास खासकरून हृदयासाठी धोकादायक आहे. कोलेस्ट्रॉल एक प्रकारचे फॅट आहे जे अधिक वाढल्यास शरीरात अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात. खराब कोलेस्ट्रॉल शरीरात वाढल्यास स्ट्रोक, हॉर्ट अॅटॅक, टाईप २ डायबिटीजसारख्या आजारांचा धोका वाढतो.


हॉर्ट अॅटॅक आणि स्ट्रोक हे जीवघेणे आजार आहेत. जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष दिले नाही तर शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. अशातच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की असे कोणते पदार्थ आहे ज्यांच्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो.



प्रोसेस्ड फूडमुळे वाढते कोलेस्ट्रॉल


बाजारात मिळणारे पॅक्ड फूड सध्या चलनात आहे. मात्र ते शरीरासाठी अजिबात चांगले नाही. पॅक्ड पदार्थ लवकर खराब होऊ नयेत यासाठी ते प्रोसेस केले जातात. अशातच खाण्यामध्ये ट्रान्स फॅट आणि सोडियमचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरसारख्या आजारांचा धोका वाढतो. तुम्हीही प्रोसेस्ड फूड खात असाल तर त्याचे मर्यादित सेवन करा.



गोड खाद्य पदार्थ


गोड खाद्य पदार्थ शरीरासाटी अतिशय हानिकारक असतात. साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यांमध्ये नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. जर तुम्ही दररोज केक, कुकीज, शेक आणि मिठाईचे सेवन करत असाल तर ही सवय आजच बदला.


धूम्रपान


स्मोकिंगची सवय आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्याऐवजी खराब कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे तुम्हाला जर आधीपासून हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर सिगारेट पिणे सोडा.

Comments
Add Comment

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

उकडीचे मोदक

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो, पण जरा हटके वाटेल असे सुंदर

Health: दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी ५ महत्त्वाच्या सवयी

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्यासह निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असते. पण हे फक्त इच्छा असून साध्य होत

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,