Yogi Adityanath : दोन दिवसात राजीनामा द्या, नाहीतर बाबा सिद्धिकीसारखा शेवट होणार!

योगी आदीत्यनाथ यांना जिवे मारण्याची धमकी


उत्तर प्रदेश : एकीकडे विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे सातत्याने विरोधकांकडून धमकी व टीकास्त्र केले जात आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे.


मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञात क्रमांकावरून आलेल्या मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. यामध्ये 'योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांत राजीनामा दिला नाही, तर त्यांचे बाबा सिद्धिकीसारखे होईल', असे लिहिले आहे. या घटनेनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.


दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे आणि अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले