Mumbai Goa Highway : टेम्पोची दोन दुचाकींना धडक ; १ ठार १ जखमी!

  109

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. एक भरधाव टेम्पो आणि दोन दुचाकीची जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून दुसरा दुचाकी स्वार जखमी झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत वैभव महाडीक (१८) आणि सिध्देश गंगाधर पवार दुचाकीवरून महाड बाजुकडे येत होते. शिंदेकोंड नजिक आले असता मागून येणाऱ्या टेम्पोने प्रथम सिध्देश पवार याच्या दुचाकीला धडक दिली. नंतर वैभव महाडीक याच्या दुचाकीला धडक दिली. या झालेल्या अपघातात दोनही दुचाकीस्वार जखमी झाले होते. त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता, त्यातील वैभव महाडीक याचा मृत्यू झाला तर सिध्देश पवार या जखमीला उपचारासाठी दुसरीकडे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


अपघात होताच दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. वैभव महाडीकला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वेळेत उपचार न झाल्यामुळे वैभवचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. त्याचबरोबर दोषी असलेल्या डॉटरांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा पंढरीनाथ महाडीक आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी घेतला आहे.

Comments
Add Comment

म्हाडा नाशिक मंडळातर्फे ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात मुंबई : नाशिकमध्ये घर शोधत असणाऱ्यांना आता सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले

ओबीसींचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

नागपूर : ओबीसी महासंघाकडून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे

मराठा समाजाचा जीआर सरसकटचा नाही

खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या