Prapti Redkar: प्राप्ती रेडकरची चाळीतल्या दिवाळीची ती आठवण

मुंबई :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावली म्हणजे प्राप्ती रेडकरने लहानपणीच्या दिवाळीची आठवण सांगितली. "आम्ही आधी चाळीत राहायचो आणि चाळीतले सर्व मित्र-मैत्रिणी एक स्पर्धा लावायचो कि जो दिवाळीच्या दिवशी पहाटे सर्वात पहिला उठेल तो जिंकणार, म्हणजे काही बक्षीस नाही मिळायचे फक्त आनंद मिळायचा. कसं कळायचं तर फटाक्याचा आवाज आला कि समजून जायचे कोणीतरी उठलंय. मी त्या स्पर्धेत ३-४ वेळा जिंकली आहे. ती मज्जाच वेगळी होती. मग सर्वांनी एकत्र फटाके फोडायचे, शेजाऱ्यांकडे फराळही करायला जायचे. चाळीतल्या दिवाळीची मज्जाच वेगळी आहे. आता आम्ही तिथे राहत नाही पण माझी आज्जी तिथेच राहते तर मी तिथे दिवाळी साजरी करायला जाते पण आता तशी मस्ती-मज्जा नाही होत आणि मी ती मज्जा मस्ती खूप मिस करते. माझ्या आयुष्यातले सोनेरी दिवस होते ते.

दिवाळीमध्ये जो तडतडणारा पाऊस असतो तशी रंगबिरंगी आहे मी, कारण मी फार बडबड करत असते. मी बेसनाच्या लाडवा सारखी आहे. बेसन लाडू खूप जणांना आवडतो तसंच माझं आहे कि जिथे जाते तिथे लोकं माझ्यावर प्रेम करतात. हे मी स्वतःच कौतुक म्हणून सांगत नाही पण असं मी अनुभवलं आहे. आता मी जी मालिका करत आहे 'सावळ्याची जणू सावली' तिथे ही मी सर्वांची लाडकी झाली आहे. असा एकही कलाकार नाही जो माझ्याबद्दल वाईट बोलतो. माझ्यासाठी छान खाऊ आणतात, मला गिफ्ट्स ही देतात म्हणून मला वाटत कि मी बेसन लाडू सारखी आहे."
Comments
Add Comment

Ek Hota Malin : एका रात्रीत अख्खं गाव मातीखाली गाडलं गेलं... अंगावर शहारे आणणारा 'एक होतं माळीण'चा टीझर प्रदर्शित

Ek Hota Malin Marathi Movie : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... ३० जुलै २०१४ ची ती काळरात्र आजही महाराष्ट्र विसरलेला

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची

Akanksha Chamola : गौरव खन्नापासून विभक्त होण्यामागचं कारण आकांक्षा चमोलाने पहिल्यांदाच सांगितलं; म्हणाली, मला....

Akanksha Chamola : टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) यांनी विभक्त होण्याचा निर्णय

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका

'Mirzapur: The Movie' : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर इंटरनेटवर सुपरहिट! रिलीज होताच YouTube ट्रेंडिंगमध्ये #1

मुंबई : अखेर चाहत्यांची बहुप्रतीक्षित प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित होताच

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.