Shaina NC : ‘‘माल बोलाल, तर जनतेकडून २३ तारखेला तुमचे हाल होणार" , ठाकरेंच्या खासदाराला फटकारलं

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार आपल्या विजयाचे गणित जुळवण्यासाठी चांगलीच धडपड करत आहेत. मुंबई आणि मुंबईतील मतदारसंघ शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी चांगलेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या दोन्ही गटांनी या ठिकाणच्या जागा जिंकण्यासाठी येथे चर्चेतील चेहरे दिले आहेत. मुंबादेवी येथून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने शायना एन सी यांना तिकीट दिलंय. दरम्यान, एकीकडे प्रचाराला वेग आलेला असताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर विशेष म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार शायना एनसी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या शिवतीर्थ येथे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आल्या होत्या. राज ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी माडियाशी संवाद साधला. शायना एनसी यांनी उपस्थित पत्रकारांना एक व्हिडीओ क्लिप ऐकवत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. अरविंद सावंत हे उबाठा गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत. अरविंद सावंत यांनी माल संबोधल्याने शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला.


“बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” अस अरविंद सावतं म्हणाले. शायना एनसी यांनी त्यांच्या ‘माल’ या शब्दावर संताप व्यक्त केला. पत्रकारांना व्हिडिओ क्लिप दाखवत शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर आरोप केला. अरविंद सावंतांनी माल शब्दाचा वापर करत संबोधल असं शायना एनसी म्हणाल्या आहेत. “राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं, यांची मानसिक स्थिती ठीक नाही” असं शायना एनसी म्हणाल्या.



‘त्यांना विचार ते कुठले आहेत?’


“हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी मी प्रचार केला. आमच्या बळावर निवडून आले. त्यांना विचारा ते कुठले आहेत?. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईची लाडली आहे. मुंबईसाठी काम करणार. मला अरविंद सावंत आणि उबाठाच्या प्रमाणपत्राची गरज नाही” असं शायना एनसी यांनी ठणकावलं.



‘माल बोलाल, तर हाल होणार’


“महिलेला माल म्हणून तुम्ही बघता. एक सक्षम महिला, प्रोफेशनल २० वर्ष स्वबळावर काम करुन पुढे आली आहे. तुम्ही तिच्यासाठी माल सारखे शब्द वापरता. तुमची मानसिक स्थिती त्यातून सगळ्यांना कळते. महाराष्ट्रातील महिला उबाठाला मतदान करणार नाही. महिलांचा सन्मान केला, तर आदर आहे. महिलांना माल बोलवलं, तर तुमचे जे हाल होणार ते २० तारखेला बघा” असं शायना एनसी म्हणाल्या.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या