मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू!

हैदराबाद : अनेकांना बाहेरचे पदार्थ खाण्याची आवड असते. मात्र रस्त्याच्याकडेला उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे आरोग्याला धोकादायक असते. याआधीही शोरमा, पाणीपुरी, मोमोज, चायनीज अशा पदार्थांतून विषबाधा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता तेलंगणातही अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.


हैदराबाद येथील बंजारा हिल्स परिसरात रस्त्यावरील एका फेरीवाल्याकडून मोमोज खाल्ल्याने एका महिलेला विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


हैदराबाद येथील रेशमा बेगम (३१) त्यांच्या मुलांसह मोमोज खाण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली. पीडित महिलेला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तब्येत जास्त खराब झाल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.


याप्रकरणी तपासादरम्यान, इतर भागातील २० रहिवाशांना देखील अन्न विषबाधामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांनी सगळ्यांनी एकाच स्टॉलवरून मोमोज खाल्ल्याचे समोर आले. पोलिसांनी स्टॉल चालवणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

Comments
Add Comment

हे भाजपा सरकार आहे, जे बोलतो ते करतो - अमित शाह

जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अकबर सर्वाधिक विवाह करणारा मुघल सम्राट, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

आजही, मुघलांची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणाने केली जाते. कधी त्यांच्या क्रूरतेसाठी, तर कधी त्यांच्या

Kavach Railway Latest Status : रेल्वे सुरक्षा ढाल 'कवच'ची दिल्ली-मुंबई, दिल्ली-हावडा मार्गावर वेगाने अंमलबजावणी!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्याच्या दिशेने मोठी आणि निर्णायक झेप घेतली आहे.

आग्रा : ताजमहाल परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग

आग्रा : जगातील सात आश्चर्यांमध्ये ज्या स्मारकाचा समावेश केला जातो त्या ताजमहालच्या परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग

देशात सर्वाधिक दैनंदिन वेतन ‘या’ राज्यात मिळते

भारतातील २०२५ मधील आर्थिक स्थिती पाहाता वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दैनंदिन वेतनात मोठी

वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी तिघांना अटक

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर जेवण्यासाठी बाहेर जात असताना बलात्कार करण्यात