नवी दिल्ली : सध्या आयपीएल २०२५ (IPL 2025) ची तयारी सुरु असून त्यासाठी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ ऑक्टोबर महिना अखेरीस त्यांच्या खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर करणार आहेत. अशातच अनेक खेळाडूंसह काही संघाचे कर्णधारही बदलणार असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. मात्र यावेळी आरसीबी (RCB) टीमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
तीन हंगामांपूर्वी आयपीएलमध्ये बंगळुरूचा कर्णधार (RCB Captain) असलेला विराट कोहली पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार असल्याचा अंदाच वर्तवला आहे. त्यानुसार कोहलीने पुन्हा बंगळुरूचे कर्णधार बनण्याचे ठरवले आहे. परंतु हे पुढील महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावानंतरच निश्चित होणार आहे.