Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीएलियनद्वारा मंगळावरुन पृथ्वीवर आलेला संदेश डिकोड करण्यात यश

एलियनद्वारा मंगळावरुन पृथ्वीवर आलेला संदेश डिकोड करण्यात यश

न्यूयॉर्क : सूर्यमालेतील ग्रहांवर पृथ्वीप्रमाणेच जीवसृष्टी असल्याचा कयास वर्षांनुवर्षे शास्त्रज्ञांकडून मांडला जात आहे. परग्रहवासीयांचा शोध घेण्यासाठी अंतराळात संदेशही पाठवले जातात. या प्रयत्नांना आता यश आले असून मंगळ ग्रहावरुन आलेला रहस्यमयी सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. युरोपियन स्पेसने एलियन मार्फत आलेला सिग्नल पृथ्वीवर पाठवला होता.

अमेरिकन पिता-मुलीच्या टीमने एलियनने मंगळ ग्रहावरुन पृथ्वीवर आलेला रहस्यमयी सिग्नल डिकोड केला आहे. यामुळे एलियनने पाठवलेल्या सिक्रेट मेसेजमध्ये काय आहे. याचा उलगडा झाला आहे. केन शॅफिन आणि केली शॅफिन अशी मसेज डिकोड करणाऱ्या पिता आणि मुलीचे नाव आहे.

SETI संस्था, ग्रीन बँक वेधशाळा, ESA आणि INAF यांनी संयुक्तपणे नागरिक वैज्ञानिक स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) च्या ExoMars Trace Gas Orbiter (TGO) ने एलियन मार्फत आलेल्या सिग्नल डिकोड करण्याचा टास्क देण्यात आला होता. पृथ्वीवर असलेल्या तीन रेडिओ खगोलशास्त्र वेधशाळांनी हा सिग्नल कॅप्चरल केला होता. जगभरातील पाच हजारांहून अधिक नागरिक वैज्ञानिकांनी हा सिग्नल डीकोड करण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सर्वजन ऑनलाईनच हे काम करत होते.

अमेरिकेच्या केन आणि केली शॅफिन यांना सिग्नल डीकोड करण्यात यश आले आहे. या सिग्नलमध्ये पांढरे ठिपके आणि रेषांचे पाच गट दिसून येतात. काळा रंगाच्या पृष्ठभागावर हे पांढरे ठिपके आहेत. या ठिपक्यांचा अर्थ म्हणजे पेशींच्या निर्मिती म्हणजेच जीवनाच्या निर्मितीकडे असा काढण्यात आला आहे. डीकोड केलेल्या संदेशात पाच अमीनो ऍसिड असतात, जे सजीवाच्या निर्मीतीत महत्वाची भमिका बजावतात. हे सर्व जैविक आण्विक आकृती आहेत. म्हणजेच जीवन देणाऱ्या अमिनो आम्लांचे आकृतीबंध आहेत असे केन आणि केली यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -