मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आपल्या घरात न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. सुरूवातीचे दोन सामने जिंकत न्यूझीलंडच्या संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना एक नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.
न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदा एखादी कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र आता शेवटचा कसोटी सामना जिंकत भारत शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. हे शक्यही होऊ शकते कारण वानखेडेमध्ये भारतीय संघाचा कसोटी रेकॉर्ड शानदार आहे.
भारतीय संघ या मैदानावर गेल्या १२ वर्षात एकही कसोटी सामना हरलेला नाही. या मैदानावर शेवटचा कसोटी सामना न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर २०२१मध्ये झाला होता. हा सामना भारताने ३७२ धावांच्या अंतराने जिंकला होता. न्यूझीलंडचा संघ हा पराभव विसरलेले नसणार.
वानखेडेमध्ये भारतीय संघाने शेवटी नोव्हेंबर २०१२मध्ये पराभव स्वीकारला होता. तेव्हा इंग्लंडने १० विकेटने हरवले होते. यानंतर भारतीय संघाने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले आणि तीनही जिंकले. यामध्ये अनुक्रमे वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि न्यूझीलंडला हरवले.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…