Western Railway : ट्रेनमधून अधिक वजनाचे सामान नेल्यास होणार कारवाई!

पश्चिम रेल्वेने घेतला निर्णय


मुंबई : लोकलमधून (Local Train) प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे रेल्वे डब्यांच्या श्रेणीनुसार ३५ ते ७० किलो सामान प्रवासी डब्यातून नेण्यास परवानगी दिली आहे. मात्र याचा कित्येकजण गैरफायदा घेत ७० किलोहून अधिक वजनाचे सामान (Overweight luggage) घेऊन प्रवास करतात. याची अडचण इतर प्रवाशांना होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याबाबत कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.


पश्चिम रेल्वेने (Western Railway) लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांनुसार १००×१००×७० सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि ७५ किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान प्रवासी डब्यातून नेताना आढळल्यास प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर रेल्वे स्थानकातील गर्दी नियोजनासाठी पश्चिम रेल्वेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे नियमापेक्षा जास्त वजनाचे आणि आकाराच्या सामानांसाठी मेल-एक्स्प्रेसच्या मालडब्यांची सुविधा आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या