आभार फाउंडेशनचा ‘माणुसकीची भिंत’ उपक्रम!

मुंबई : माणुसकीची भिंत ही संकल्पना समाजातील गरजू आणि देणाऱ्यांमधील एक अनोखी जोडणे बनली आहे. पुंडलिक लोकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आणि आभार फाउंडेशनच्या पुढाकाराने यशस्वीपणे राबवला गेलेला हा उपक्रम यंदा १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पेनिन्सुला बिझनेस पार्क, लोअर परेल येथे आयोजित करण्यात आला होता.


यंदा या उपक्रमात तब्बल ४५००० पेक्षा जास्त कपडे, खेळणी, चप्पल, शालेय साहित्य आणि गृहोपयोगी वस्तू जमा झाल्या, ज्यामधून ३५००० हून अधिक वस्तू गरजवंतांना वाटप करण्यात आल्या. या वस्तू घेणाऱ्या गरजवंतांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंदच माणुसकीचा खरा चेहरा होता. उर्वरित वस्तूवर प्रक्रिया करून खेडेगाव, आदिवासी पाडे, वृद्धाश्रम आणि महिलाश्रम यांना वाटण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत, असे फाउंडेशनचे सदस्य नेताजी सावंत यांनी सांगितले. आभार फाउंडेशनचे अध्यक्ष महेश चव्हाण यांनी या उपक्रमाची संकल्पना उलगडताना सांगितले, देणाऱ्याच्या मनात नेहमीच माणुसकी जिवंत असते.


परंतु, गरजू व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्या व्यक्तींनाही मदत कुठून मिळेल हे माहीत नसते. या माणुसकीच्या भिंतीने या दोन्ही वर्गांना एकत्र आणले आहे. घरात अडगळीत असलेल्या वस्तूंनी कोणाच्या जीवनात मोठा बदल घडवता येतो, हे या उपक्रमातून सिद्ध झाले आहे."यावर्षीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, आभार फाउंडेशनने खेड्यांतील शाळकरी मुलांसाठी १००० सायकल्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. प्रवासाच्या साधना अभावी शाळा सोडणाऱ्या मुलांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळावी यासाठी फाउंडेशनने हा पुढाकार घेतला आहे. मुंबई अग्निशमन दलाचे उपप्रमुख बनगर साहेब आणि विभागीय अधिकारी माटले साहेब यांनी पहिली मदत म्हणून नवीन सायकल्स दान केल्या.


बऱ्याच हाउसिंग सोसायटीमधून जुन्या सायकल उपलब्ध झाल्या त्या दुरुस्त करून गरजवंतांपर्यंत पोहचवला जातील. हा उपक्रम गरजू मुलांच्या शिक्षणासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरेल.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :

ई-रिक्षां व ई-बाईकसाठीही परमिट (परवाना ) बंधनकारक करण्याचा निर्णय -- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सींसाठी नवीन परमिट देण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून तात्पुरती स्थगित

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी