गौतम गंभीर द.आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाही, या दिग्गजाकडे जबाबदारी

मुंबई: न्यूझीलंडविरुद्ध सध्या सुरू असलेली कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ४ टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. या दौऱ्यावर भारतीय संघ आपला पहिला टी-२० सामना ८ नोव्हेंबरला डरबनमध्ये खेळत आहे. यानंतर संघ १० नोव्हेंबरला होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी गकेबरहा जाणार. त्यानंतर सेंच्युरियनमध्ये १३ नोव्हेंबरला आणि जोहान्सबर्ग येथे १५ नोव्हेंबरला सामने खेळवले जातील.


आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या दौऱ्यावर संघासोबत असणार नाहीत. आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ ४ नोव्हेंबरला रवाना होईल. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे. अशातच गंभीर केवळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकेल.


गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत व्ही व्ही एस लक्ष्मण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक असतील. चार सामन्यांची ही टी-२० मालिका आधी ठरलेली नव्हती मात्र बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यातील बातचीतनंतर याला अंतिम रूप देण्यात आले.


साईराज बहुतुले, ऋषिकेश कानिटकर आणि सुभादीप घोषही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोचिंग स्टाफचा भाग असतील.

Comments
Add Comment

Venezula Earthquake : फिफा वर्ल्ड कप सुरू असताना स्टार खेळाडूला मोठा धक्का ! भूकंपामध्ये पार्टनरचा..

Venezuela : व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपात अनेक लोकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

WI VS SL : वेस्ट इंडिजने रचला इतिहास ! टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील १४९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला

बार्बुडा: वेस्ट इंडिजच्या कामगिरीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील

NZ VS ENG : न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का ! एकाच वेळी तीन दिग्गज खेळाडूंनी घेतली निवृत्ती

इंग्लंड खेळाडूंकडून मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर' लंडन : टी-२० महिला वर्ल्ड कप २०२६ मध्ये शनिवारी (२७ जून) ला गविजेता

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाची विजयी घोडदौड कायम; मेस्सीचा नवा विक्रम

अर्लिंग्टन, टेक्सास : गतविजेत्या अर्जेंटिनाने जॉर्डनचा ३-१ असा पराभव करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गट फेरीचे

FIFA WORLDCUP 2026 : ऑस्ट्रिया आणि अल्जेरियाची बाद फेरीत धडक; इराण स्पर्धेतून बाहेर

कॅन्सस सिटी: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी रात्री झालेल्या एका चित्तथरारक सामन्यात ऑस्ट्रिया आणि अल्जेरिया

FIFA WORLDCUP 2026 : काँगोची ऐतिहासिक कामगिरी; उझबेकिस्तानचा पराभव करत बाद फेरीत प्रवेश

अटलांटा: योआने विसाच्या दोन शानदार गोलांच्या जोरावर काँगोने शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात उझबेकिस्तानचा