परतीचा पाऊस...

राजश्री वटे


जाता जाता पावसाने पुन्हा एकदा वळून पाहिले...जसे डोळ्यांतून त्याच्या अश्रू वाहत होते...धरणी मातेचा पदर भिजवून आकाशाकडे परत निघाला आहे...हिरवीगार झालेली झाडे बघून तो आनंदात होता की... जायचं आहे त्याचं दुःख होतं...
वाटलं... ते पावसाचे थेंब काही सांगू पाहत आहे जणू... एकवार गळाभेट करून बघू या... आत साचलेला पाऊस आपोआप बाहेर येईल...मनावरचे ओझे उतरून जाईल... मन तरंग तरंग होऊन जाईल...कोणाला कळणार ही नाही पाणी डोळ्यांतून वाहतं आहे की पावसाच्या डोळ्यांतून!! डोळ्यांतील अश्रू केव्हाही झरतात... नकळत...ना हम जाने...ना तुम!! का कोणास ठाऊक...कधी कधी मन आतून खूप भरले आहे आभाळासारखे... डोळे पाणावलेले भासतात... असे वाटते केव्हा बरसतील अवेळी पावसासारखे... काही कारण लागत नाही वहायला...फक्त... दुःखातच नव्हे... थोडसे सुख जवळ आले तरी डोळ्यांचे पाझरणे नाही थांबवू शकत... कसे सांगावे... कुठेही... काही कारण नसताना... हे बेबंद होऊन जातात... काळे ढग जमून येतात तेेव्हा मनाची चलबिचल होऊन डोळ्यांतला पाऊस बरसायला लागतो... कुठलं कुठलं काहीसं आठवायला लागतं! सूर्याचे उगवते रूप असो... मावळती संध्याकाळ असो... काहीसे जुने आठवते व नकळत श्वास ओलसर होत जातो... एकटे असताना देखील कधी... रात्रीच्या वेळी आकाशाकडे नजर गेलीच तर... तारकांची सजलेली मैफल नजरेस पडते... बस, ये जश्न जो देखा तो... हळव्या मनाचे व्यक्त होणे डोळ्यांतून तरंगणाऱ्या पाण्यातून दिसते... कधी समजतच नाही... या मनाला कसे आवरावे!!


सागरकिनारी लाटांसमवेत गुजगोष्टी कराव्यात तेव्हा मनात आपोआप गुणगुणायला लागते एक चिंब भिजलेली गझल!
मनाला भिजायला काहीही कारण लागतं... कोणाच्या प्रेमळ बोलण्याने... कुणाचे दुःख ऐकल्याने... एखादे गम भरे गीत ऐकल्याने सुद्धा... गळा भरून येतो... भक्तिरसातले गीत देखील निमित्त ठरते मनाच्या पावसाला! अगदी तिरंगा पाहाताच देखील गळा दाटून येतो...सगळे आठवून डोळे भरून येतात... शब्द दाटतात... हरवून जातात... कोणास ठाऊक कां... कित्येकदा अश्रूंना सांगून बघितले... वाहण्या आधी माझी परवानगी घ्यायला विसरत जाऊ नकोस... मला एकट्याला भेटत जा... पण नाही... ऐकेल ते अश्रू कसले... बरसतात... वाहतात... डोळ्यांमधल्या खोल डोहात खळबळ माजवून जातात...कोणी आसू पुसेल म्हणून वाट पाहतात...पुसणारे कोणी असेल तर वाहण्यास अर्थ आहे... नाहीतर ते वाहणे सुद्धा व्यर्थ आहे! असे हे आतल्या व बाहेरच्या पावसाचे अतूट नाते... थांबता थांबता पुन्हा वाहते!! हा परतीचा पाऊस केव्हा बरसेल... कोणास ठाऊक?

Comments
Add Comment

शहराचा विकास, माणसांची कोंडी

- संवाद; निशा वर्तक शहर वाढत आहे. उंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते रुंद होत आहेत. मेट्रो, पूल, मॉल्स आणि आधुनिक

हम होंगे कामयाब...

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे कालच देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभर आणि जगातील सर्व भारतीय वकिलातीत साजरा

बहीण-भावाचे नाते आयुष्यभर जपले!

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे रक्षाबंधन हा सण काळानुसार बदलला असला, तरी बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे

श्रावण मास

-  निमित्त; संध्या काटदरे बालकवींनी श्रावण मासाचे सुंदर वर्णन केले आहे - ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे

आला श्रावण...

-प्रासंगिक; मंजिरी ढेरे श्रावणात प्रत्येकाच्या मनात निळा घन बरसत असतो. परंपरारक्षणाचा संदेश देणारा हा मास

मुलांनो, विचार बदला… भविष्य बदलेल !

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू मुलांनो, आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर नेहमी परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात