रविवारी मुख्य व हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई :मध्य रेल्वे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे कारण्याकरता उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल. या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.


ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यावर थांबून पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत हा ब्लॉक असेल.


पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींचा मुंबईत जोरदार 'प्रहार'! 'नाव न घेता' उद्धव ठाकरेंना दिला मोठा 'झटका'

मेट्रो प्रकल्प रोखला; मुंबई हल्ल्यावरून काँग्रेसवरही केला घणाघात नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण

प्रेमानंद महाराजांची प्रकृती खालावली; व्हिडिओ पाहून भक्त भावूक

मुंबई : वृंदावनचे संत प्रेमानंदजी महाराज यांचा एक व्हिडिओ अलीकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर

मुंबई महापालिकेतील संगणकांचे होणार ऑडीट

सचिन धानजी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या संगणकांचे आता लेखा परिक्षण

ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज

मुंबई मेट्रो मार्गिका-३च्या अंतिम टप्प्याचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड चालणार मेट्रो

मुंबई: पंतप्रधान मोदी आजच्या मुंबई दौऱ्यात मुंबई मेट्रो मार्गिका-३ (Aqua Line) च्या अंतिम टप्प्याचे (टप्पा-२बी, आचार्य