मुंबई: भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आङे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियामध्ये केएल राहुललाही संधी मिळाली आहे. राहुल नुकताच खराब कामगिरीमुळे चर्चेत होता. जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा उप कर्णधार असणार आहे.
अभिमन्यू-ईश्वरन आणि प्रसिद्ध कृष्णाला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. नीतीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात स्थान मिळाले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १५ नोव्हेंबरपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे .यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यावरही विश्वास ठेवला आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल विकेटकीपर म्हणून संघाचा भाग बनले आहेत. सर्फराज खानलाही टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाची घातक गोलंदाजी
बुमराह टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आणि आकाशदीप ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाचा भाग असणार आहे. प्रसिद्ध कृष्णा दीर्घकाळानंततर टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी, वाशिंगटन सुंदर.