Google Doodle : गुगलने बनवलं अष्टपैलू गायक केके यांचं डुडल!

नेमकं कारण काय?


मुंबई : कोणताही सण, खेळ, विशेष दिवस असो किंवा भारताची यशस्वी मोहिम असो अशावेळी गुगलकडून नवं 'डल'द्वारे (Google Doodle) शुभेच्छा दिल्या जातात. गुगल 'डूडल' हा एक उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरतो. गुगलचे नवे डूडल काय असेल याविषयी सर्वांनाच नेहमीच आकर्षण असते.


आज गुगलवर एका अष्टपैलू गायकाचं डुडल तयार केलं आहे. कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच 'केके' यांचं खास डुडल तयार केलं आहे. मात्र आज त्यांचा जन्म किंवा पुण्यतिथी नसली तरीही गुगलने हे डुडल का तयार केले असा प्रश्न सर्व नेटकऱ्यांना पडत आहे. पाहा यामागचं नेमकं कारण काय.



आजच्या दिवशी केके यांचं बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण


२५ ऑक्टोबर १९९६ साली माचिस सिनेमातून केके यांनी बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले होते. ‘छोड़ आए हम’ या गाण्याने त्यांच्या कामाची सुरुवात झाली होती. यानंतर १९९९ मध्ये केके यांनी 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील ‘तड़प तड़प के इस दिल से’ हा गाणं गायले होते. यानंतर चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. केके यांच्या म्युझिक अल्बमची तरुणाईत विशेष क्रेझ होती. अजूनही तरुणाईत ही क्रेख कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे केके यांचा वारसा साजरा करण्यासाठी गुगलने केके याचं खास डुडल तयार केले.

Comments
Add Comment

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर