विधानसभेसाठी शरद पवार गटाने जाहीर केली पहिली यादी, अजित पवारांविरोधात कोणाला दिले तिकीट?

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी(assembly election) शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गुरूवारी २४ ऑक्टोबरला पक्षाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार बारामती मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. या जागेवरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात आहेत.

पहिल्या यादीत ४५ नावांची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत जागा वाटपात शरद पवार यांच्याकडे ८५ जागा आल्या आहेत. इतक्याच जागा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या खात्यात आल्या आहेत. आता उरलेल्या जागांवर चर्चा केल्यानंतर घोषणा केली जाईल.

कोण आहे युगेंद्र पवार?


युगेंद्र पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. ते अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांचे यांचे पुत्र आहेत. युगेंद्र पवार यांचा स्वभाव अतिशय शांत आहेत. अशातच त्यांना चांगले संघटनकर्ते मानले जात आहेत.

पहिल्या यादीत यांना संधी


पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार - बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपलूण
समरजीत घाटगे - कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहंकाळ
प्रशांत जगताप -हडपसर
जयंत पाटील - इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बालासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कलबा मुंब्रा
शशिकांत शिंदे - कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जलगांव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराला
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
Comments
Add Comment

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या