पाहा काय आहेत आजचे सोनं-चांदीचे दर?
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे. परंतु आज सकाळी सोन्याचा भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र चांदीने उच्चांक दर (Silver Price Hike) गाठला आहे. आजच्या दरात चांदीच्या किंमती तब्बल लाखांच्या पुढे पोहचल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता सोन्यासोबत चांदी खरेदी करणंही महाग पडणार आहे. पाहा काय आहेत सध्याचे सोनं-चांदीचे दर.
काय आहेत सोन्याचे दर?
- २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७ हजार ९७८ रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ७९ हजार ७८० रुपये आहे.
- २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३१४ रुपये आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव ७३ हजार १४० रुपये आहे.
चांदीचा भाव काय?
आज १ किलो चांदीचा भाव आज १०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आजचा भाव १ लाख २ हजार रुपये इतका आहे. हेच दर राज्यातील विविध शहरात आहेत.